" युवा "
तरुण म्हणजे केवळ सळसळत्या रक्ताचा आणि उसळत्या आवेगाचा नाही, तर त्यापलीकडेही रुढ चाकोरी मोडणारे, कलेचा आविष्कार घडविणारे, राजकीय मुलखात बाजी मारणारे, स्थानिक पातळीवर कोंडी झाल्यानंतर रोजगारासाठी सैन्यभरतीपासून ते महानगरांमध्ये अवकाश शोधणारे.
केवळ आपल्याच स्वप्नांच्या दुनियेत रममाण होणं हे तरुणाईचं वैशिष्ट्य नाही. न पटणार्या, खटकणारया गोष्टी धिटाईनं सांगणं, त्यासाठी रस्त्यावर उतरणं, सत्तेचं अनिर्बंध स्वरुप दिसू लागल्यानंतर सत्ताधीशांच्या आसनाखाली सुरुंग पेरणं आणि व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी बेभानपणे आयुष्य उधळणं हेही तरुणाईचं अभिन्न असं वैशिष्ट्य आहे.
स्थळ - काळाच्या मर्यादा ओलांडून जेव्हा तरुणाईतले काही जिगरबाज चेहरे नवी क्षितिजं पादाक्रांत करु लागतात तेव्हा यशाच्या कल्पनांची ओळख नव्याने व्हायला लागते.
तरुण म्हणजे केवळ मोरपंखी आठवणीत आकंठ बुडालेला...... एवढंच चित्र नाही, तरुणांनी किती तरी चळवळी जन्माला घातल्या, लढ्याचं नेतृत्व केलं आणि सरकारेही उलथवली, असं जगाचा इतिहास सांगतो.
पेटलेल्या निवार्यावर राख जमते. हळूहळू राखेचा थर साचत जातो. मग त्यातली आग ठार मेलेली असते. निखारा सदैव फुललेला असेल, तर त्यावर राख जमा होत नाही. तरुणाईचंही असचं आहे.

No comments:
Post a Comment